बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बडस येथे नवरात्रोत्सवानिमित्त आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी श्री दुर्गामातेची प्रतिष्ठापना करून विशेष पूजा केली.

बडस येथील आदिशक्ती दुर्गामाता युवक मंडळाच्या वतीने आयोजित श्री दुर्गामातेच्या प्रतिष्ठापना सोहळ्यात आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी उपस्थित राहून विधिवत पूजा केली. या वेळी त्यांनी राज्यातील जनतेच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.

यानंतर त्यांनी श्री जगद्गुरू मडीवाळेश्वर तपोधामाला भेट दिली. तिथे मौनानुष्ठान सुरू असलेल्या श्री प्रशांत देवांचे दर्शन घेऊन त्यांनी आशीर्वाद घेतले. या वेळी ग्रामस्थ, पक्षाचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Belagavi
बडस गावात आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते श्री दुर्गामातेची प्रतिष्ठापना व पूजा


Recent Comments