Belagavi

आजच मागण्या मान्य झाल्यास आंदोलन मागे: शेतकरी नेते चुनप्पा पुजारी

Share

उसाच्या दरासह विविध मागण्यांसाठी कित्तूरहून निघालेल्या पदयात्रेच्या पाचव्या दिवशी शेतकरी नेते चुनप्पा पुजारी यांनी सरकारने आजच मागण्या मान्य केल्यास आंदोलन मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे.

किस्मती आणि उसाला योग्य भाव, एथॅनॉल व साखरेचे दर निश्चिती या मागण्यांसाठी ही पदयात्रा गुळेदकोप्पकडे वाटचाल करत आहे. आमदार व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली असली तरी हा राज्यव्यापी लढा असल्याने केवळ तोंडी आश्वासनांवर समाधान मानणार नाही; केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्वतः येऊन स्पष्ट घोषणा करावी, अशी मागणी त्यांनी केली.

पाऊस आणि विजेच्या अभावामुळे शेतकरी आधीच संकटात आहेत. एका टन उसासाठी सुमारे साडेपाच हजार रुपये खर्च येत असून पंतप्रधान आणि खासदार यांनी यात तातडीने हस्तक्षेप करावा, असे ते म्हणाले. सरकारने योग्य तो निर्णय न घेतल्यास २२ ऑक्टोबर रोजी केरेकोप्प राष्ट्रीय महामार्गावर लाखो शेतकरी एकत्र येऊन पुढील तीव्र आंदोलनाची दिशा ठरवतील, असा इशारा त्यांनी दिला.

Tags: