Belagavi

लाईनमनवरील मारहाणीचा आरोप पूर्णपणे खोटा: लक्ष्मी हेब्बाळकर

Share

बेळगावमध्ये लाईनमनवर मारहाण करण्यात आल्याचा आणि त्याला सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा आरोप माजी मंत्री, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे.

आपल्या भावावर झालेले आरोप फेटाळताना त्या म्हणाल्या की, सफाई कामगार आणि लाईनमन यांच्या सेवेबद्दल आम्हाला आदर असून त्यांचे कल्याण करण्यासाठी आमचे कुटुंब नेहमीच कटिबद्ध आहे.

खांबावरून पडून गेल्या ९ वर्षांपासून अंथरुणाला खिळलेल्या एका लाईनमनला १८ लाख रुपयांची भरपाई मिळवून दिली असून त्याच्या पत्नीला नोकरीला लावल्याचे उदाहरण त्यांनी दिले.

शेतकऱ्यांची कामे करून घेताना कधीकधी जरा आवाजात बोलले गेले असेल, पण कोणावरही मारहाण करण्याचा प्रकार घडलेला नाही, असे स्पष्टीकरण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिले.

Tags: