Athani

अळगवाडीत मंदिरे स्वच्छता अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Share

अथणी तालुक्यातील अळगवाडी येथे ‘स्वाभिमानी स्वतंत्र संघ’च्या वतीने गावातील प्रमुख मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला.

या मोहिमेअंतर्गत श्री लक्ष्मी देवी, श्री पांडुरंग, श्री रामलिंगेश्वर, श्री दुर्गा देवी, १००८ श्री आदिनाथ जैन मंदिर आणि श्री दत्त मंदिराची स्वच्छता करण्यात आली. तसेच प्रत्येक मंदिराला दोन कचराकुंड्यांचे वाटप करण्यात आले.

देवाची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करत, भविष्यातही असे सामाजिक आणि सेवाभावी उपक्रम नियमितपणे राबवले जातील, असे कार्यकर्त्यांनी सांगितले.

केएलई संस्थेचे निवृत्त प्राचार्य हनुमंत गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली असून, या उपक्रमात अनिल सुतार, सचिन ऐतवाडे, धरणेश बंदीकेरी, परशुराम शिरगुरे, मुत्तू राजापुरे आदी सहभागी झाले होते.

Tags: