Dharwad

पश्चिम पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

Share

पश्चिम पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून, भाजपचे उमेदवार एस. व्ही. संकनूर आज आपला अर्ज दाखल करणार आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आली असून, भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्यासह स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत रोड शो काढून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण केले जाणार आहे.

या रोड शोमध्ये भाजपचे आमदार, विधान परिषद सदस्य आणि जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

दरम्यान, या निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे मोहन लिंबिकाई तसेच अपक्ष उमेदवारांनी यापूर्वीच उमेदवारी अर्ज दाखल केले असून निवडणूक रिंगणात चुरस निर्माण झाली आहे.

Tags: