धारवाडच्या हेब्बळ्ळी जिल्हा पंचायत सदस्य व भाजप नेते योगेशगौडा हत्या प्रकरणातील माफीचा साक्षीदार असलेल्या बसवराज मुत्तिगी यांच्या कार चालकाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कार चालक प्रकाश नवलूर यांच्या कुरुबगट्टी येथील निवासस्थानी ६ तरुण आले होते. प्रकाश यांच्या गरोदर पत्नीला धमकावत, पतीने मुत्तिगी यांच्याकडे काम सोडले नाही तर त्याचा मृतदेहच घरी येईल, अशी धमकी दिल पाहावयास मिळाले.

या प्रकरणी कार चालक प्रकाश यांनी गरग पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली असून आरोपींच्या अटकेची मागणी केली आहे.
दुसरीकडे, माजी मंत्री विनय कुलकर्णी यांच्या जामीन व शिक्षेच्या स्थगितीविरोधात योगेशगौडा यांच्या कुटुंबाने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता कोणते वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Recent Comments