Bagalkot

भाजपचा ‘एसआयआर’च्या नावाखाली मतदारांची नावे वगळण्याचा डाव

Share

भाजप ‘एसआयआर’च्या नावाखाली अल्पसंख्याक, दलित आणि मागासवर्गीयांची नावे मतदार यादीतून वगळण्याचे कुभांड रचत असल्याचा गंभीर आरोप आमदार विजयानंद काशप्पनवर यांनी केला आहे.

अमरावती येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, दक्षिण भारतात थेट सत्तेत येणे शक्य नसल्याने भाजप २०२८ च्या विधानसभा निवडणुकीसाठी या मार्गाचा अवलंब करत आहे.

हजारो अर्जांची माहिती भाजप प्रदेशाध्यक्षांपर्यंत कशी पोहोचली, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेबद्दलही संशय व्यक्त केला.

शासनाच्या लोककल्याणकारी योजनांमुळे घाबरलेले भाजप नेते आता आंदोलनाचा आणि पदयात्रांचा ड्रामा करत असल्याचे ते म्हणाले.

भाजपाचा कोणताही डाव कर्नाटकात यशस्वी होणार नाही आणि जनतेच्या पाठिंब्यावर २०२८ मध्ये पुन्हा काँग्रेसचेच सरकार स्थापन होईल, असा विश्वास काशप्पनवर यांनी व्यक्त केला.

Tags: