बेळगावमध्ये सीआयटीयू राज्य समितीच्या नेतृत्वाखाली कामगार कायद्यांमधील बदल रद्द करण्यासाठी आणि किमान वेतन लागू करण्यासाठी निदर्शने करण्यात आली. यासंदर्भात कामगारांच्या विविध मागण्यांचे निवेदन माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना देण्यात आले.

सीआयटीयू राज्य समितीच्या नेतृत्वाखाली कामगार कायद्यांमधील बदल रद्द करणे, किमान वेतन लागू करणे आणि असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा देणे या मागण्यांसाठी शेकडो कामगारांनी आंदोलनात भाग घेतला होता.

यापूर्वी कामगार मंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर आणि मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले होते.
मात्र सरकारने आश्वासन न पाळल्याने आमदार आणि मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यानुसार माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.


Recent Comments