बेळगाव महानगर आणि ग्रामीण भागातील कोर कमिटी सदस्यांसह पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर आमदार अभय पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. निवडणुकीशी संबंधित अर्जांची पडताळणी करणे हे निवडणूक आयोगाचे काम असून पोलिसांचे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस नेत्यांच्या दबावाखाली काम न करता पोलिसांनी कायद्यानुसार कर्तव्य बजावावे, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार अनिल बेनके यांनीही पोलीस आणि सरकारच्या कारभारावर टीका करत कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा विश्वास व्यक्त केला.

माजी आमदार संजय पाटील यांनीही पोलीस प्रशासनाच्या कारवाईचा निषेध करत, स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या दबावाखाली पोलीस भाजप कार्यकर्त्यांना नाहक त्रास देत असल्याचे मत व्यक्त केले.


Recent Comments