Belagavi

शृंगारी कॉलनीमध्ये विविध सामाजिक, धार्मिक उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा

Share

बेळगाव येथील शृंगारी कॉलनी, बाडीवाले कॉलनी आणि टीचर्स कॉलनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवून गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास आमदार अभय पाटील यांच्या पत्नी प्रीती पाटील, बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर प्रीती कामकर आणि मीना बेनके यांच्या उपस्थितीत सुमारे ७५० महिलांनी सहभाग घेतला.

यावेळी सत्यनारायण महापूजा, विष्णू सहस्रनाम जप, महाआरती तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आले. याप्रसंगी विनायक कामकर, प्रवीण पिळणकर यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

मुलांसाठी धावण्याची शर्यत, कॅरम, बुद्धिबळ, क्रिकेट, फुटबॉल, चित्रकला, नृत्य आणि गायन अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. मंडळाचे अध्यक्ष विनायक काकतीकर व विक्रेता काकतीकर यांच्या हस्ते पूजन करून विसर्जन मिरवणुकीची सुरुवात झाली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वागत अध्यक्ष ॲड. शिवकुमार उडकेरी, तुकाराम शिंदे, गणपत वडेर गुरुजी, सूर्यकांत हिंदळगेकर, विश्वनाथ येळूरकर यांच्यासह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Tags: