Chikkodi

चिक्कोडीत भरधाव ट्रॅक्टर थेट शिरला घरात

Share

चिक्कोडी शहरातील इंदिरा नगर भागात एक भरधाव ट्रॅक्टर थेट घरात शिरल्याने अपघात घडला.


ट्रॅक्टर अचानक ताबा सुटून घरात घुसल्याने ट्रॅक्टर चालक आणि घरातील काही जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेत घराची भिंत आणि घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून अधिक माहिती गोळा केली जात आहे.

Tags: