खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील निलावडे ग्राम पंचायत हद्दीतील आंबोळी गावच्या जवळ असलेल्या मायादेवी मंदिराआवारातील शिवारात शनिवारी रात्री सहा हत्तीनी आंबोळी गावचे
शेतकरी राम लिंग सावळाप्पा नाईक यांच्या ऊस, भात,व केळी आदी पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे.


गेल्या आठ दिवसापूर्वी निलावडे ग्राम पंचायत हद्दीतील कबनाळी गावच्या बेटगेरी व भोई शिवारात शेतकरी लक्ष्मण माने ,चाळोबा हुळणकर, उमाजी गावडे, आदीच्या शिवारात हत्तीच्या कळपाने पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान केले.
निलावडे भागात हत्तीचा धुमाकुळ सुरूच आहे.त्यामुळे याभागातील शेतकरी भितीच्या छायेत आहेत. तेव्हावनखात्याने हत्तीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी याभागातील शेतकरी वर्गातुन होत आहे.

याभागात हत्तीकडुन उसाचे प्रचंड नुकसान लैला साखर कारखान्याने उस लवकर उचलावा!

गेल्या आठ दिवसापासुन निलावडे भागातील ऊस पिकांचे हत्तीकडुन प्रचंड नुकसान केले आहे.त्यामुळे शेतकर्याचे कंबरडेच मोडले आहे. तेव्हा याभागात जो ऊस आहे.तो ऊस सर्व प्रथम लैला साखर कारखाण्याने उचलावा अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.
#वनखात्याने हत्तीचा बंदोबस्त करावा,
अन्यथा वनखात्याच्या कार्यालयासमोर उपोषनाचा इशारा विनायक मुतगेकरांनी दिला!
निलावडे ग्राम पंचायत हद्दीतील आंबोळी, कबनाळी आदी गावच्या शेतकर्याच्या शेतातील ऊस, भात , व केळी पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान केले आहे. तेव्हा वनखात्याने निलावडे ग्राम पंचायत हद्दीत येणार्या हत्तीचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा. अन्यथा खानापूर वनखात्याच्या कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा निलावडे ग्रामपंचायतीचे माजी उपाध्यक्ष विनायक मुतगेकर यानी दिला आहे.


Recent Comments