धारवाडमधील टीकारे गवळी गल्ली येथील गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत मुस्लिमांनी गणपतीला पुष्पहार अर्पण करून सामाजिक सलोख्याचा संदेश दिला.

धारवाड येथील टीकारे गवळी गल्लीत बसवण्यात आलेल्या रामराज्य गणेश मंडळाच्या मूर्तीची विसर्जन मिरवणूक पार पडली. मिरवणूक टीकारे रस्त्यावरील मदिना मशिदीजवळ आली असता मुस्लिम समाजातील प्रमुखांनी गणपतीला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे आपुलकीने स्वागत केले. या प्रसंगी भाजप नेते राकेश नाझरे, एसीपी प्रशांत सिद्धगौडर, पोलीस उपनिरीक्षक विनोद आणि नागरिक उपस्थित होते. यानंतर मिरवणूक सुभाष रोड, गांधी चौक व होसयल्लापूर मार्गे जाऊन नुच्चंबळी विहिरीत श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.



Recent Comments