Dharwad

कलबुर्गीत सिद्धरामय्या यांचा पुतळा हटवल्याचा धारवाडमध्ये निषेध

Share

कलबुर्गी येथे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा पुतळा जिल्हा प्रशासन आणि महापालिका अधिकाऱ्यांनी हटवल्याच्या निषेधार्थ धारवाडमध्ये कुरुबा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

धारवाड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुरुबा समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत कलबुर्गी जिल्हा प्रशासन आणि महापालिकेच्या कारभाराविरोधात जोरदार निदर्शने केली.पुतळ्याची तातडीने पुनर्स्थापना करावी, अशी मागणी करत आंदोलकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.

पूर्वपरवानगी न घेता पुतळा बसवल्याचे कारण देत तो रातोरात हटवणे अत्यंत चुकीचे असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. हा केवळ माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचाच नव्हे, तर संपूर्ण समाजाचा अपमान असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

कलबुर्गी जिल्हा प्रशासन आणि महापालिकेने ज्या ठिकाणी पुतळा हटवला आहे, त्याच जागेवर त्याची पुन्हा उभारणी करावी, असा आग्रह आंदोलकांनी धरला आहे.

प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कुरुबा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

Tags: