धारवाड शहरात सात दिवस मोठ्या भक्तिभावाने पूजन केलेल्या श्री गणेशाची उत्साहात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. विसर्जन स्थळावर अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

धारवाड शहरातील मुख्य चौक आणि विविध गल्लीबोळांत स्थापन करण्यात आलेल्या गणेश मूर्तींची रविवारी भव्य मिरवणूक काढण्यात आली. मुख्य चौकातून निघून गांधी चौक मार्गे ही विसर्जन मिरवणूक नुच्चंबळी विहिरीकडे पोहोचली. या मिरवणुकीत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

रात्री १० वाजेची वेळ पाळत अनेक मंडळांनी ध्वनिवर्धक बंद करून नियमांचे पालन केले. त्यानंतर विसर्जन स्थळी पोहोचून भाविकांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला.
विहिरीच्या पात्रात कोणालाही उतरू न देता प्रशासनाने काठावरूनच सुरक्षितपणे विसर्जन करण्याची उत्तम व्यवस्था केली होती. पोलिसांच्या या नियोजनबद्ध आणि कडक बंदोबस्ताचे सर्वसामान्य नागरिकांनी कौतुक केले.


Recent Comments