कागवाड येथील श्री शिवानंद महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य तथा ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ बी. ए. पाटील यांचे बुधवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले.

दिवंगत बी. ए. पाटील यांचे वेदांत केसरी मल्लिकार्जुन महास्वामीजी, विजापूर ज्ञानयोग आश्रमाचे सिद्धेश्वर स्वामीजी, कोल्हापूर कन्नेरी मठाचे स्वामीजी आणि कागवाड गुरुदेव आश्रमाचे यतेश्वरानंद स्वामीजी यांच्याशी अत्यंत आपुलकीचे संबंध होते. विविध धार्मिक उपक्रमांमध्ये ते सक्रियपणे सहभागी होत असत.

त्यांनी कागवाड येथील श्री सिद्धेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक तसेच गावातील मल्लिकार्जुन बँक आणि अनेक सामाजिक व धार्मिक संस्थांच्या विकासासाठी विशेष योगदान दिले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, एक मुलगी, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.


Recent Comments