वीर सावरकर मित्र मंडळाच्या वतीने धारवाड येथे प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणेशमूर्तीचे तीन दिवसांच्या पूजनानंतर भव्य मिरवणुकीसह विसर्जन करण्यात आले.


माळमड्डी स्टेशन रस्त्यावर तीन दिवसांच्या विशेष पूजेनंतर मूर्ती सजवून शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांच्या गजरावर भाविकांनी ठेका धरला. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात मिरवणूक पार पडली. मुख्य रस्त्यावरून गेलेली मिरवणूक नागरिकांनी पाहिली. त्यानंतर धार्मिक विधीनुसार शहरातील नुचंबळी विहिरीत मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.



Recent Comments