बैलहोंगल जवळील होसूर येथील ज्येष्ठ वेदमुर्ती वासय्या वी्रय्या हिरेमठ (वय १०५) यांचे शनिवारी निधन झाले.

सतत धार्मिक अभ्यास, सदाचार आणि ज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी समाजाला मार्गदर्शन केले. त्यांच्या निधनाने होसूर परिसरात शोककळा पसरली आहे.

त्यांच्या अंत्यविधीप्रसंगी मुरगोड येथील दुरदुंडेश्वर मठाचे नीलकंठ स्वामीजी, होसूर मडीवाळेश्वर मठाचे गंगाधर स्वामीजी, ममदापूरचे मौन मल्लिकार्जुन स्वामीजी, बैलहोंगल विरक्तमठाचे प्रभु नीलकंठ स्वामीजी यांच्यासह विविध मठांचे स्वामीजी, मान्यवर आणि हजारो भाविकांनी अंतिम दर्शन घेतले.


Recent Comments