hubali

पुष्करणीच्या संरक्षणासाठी हुबळीत मोठे आंदोलन

Share

हुबळीतील भवानीशंकर मंदिराच्या संरक्षणासाठी पुकारलेल्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला असून आंदोलन सुरु झाले आहे. यावेळी बॅरिकेड्स हटवून आत शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आमदार अरविंद बेल्लद, प्रदीप शेट्टर, आमदार महेश टेंगिनाकाई, श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक आणि संरक्षण समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात हजारो नागरिक सहभागी झाले होते. दरम्यान, हुबळी-धारवाड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलिसांनी आंदोलनाला अटकाव करत अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन इतरत्र हलवले आहे.

आसारहोंड रस्त्यावरील चन्नपेठ येथे पुष्करणी संरक्षण समितीने भजन करत घोषणाबाजीद्वारे आंदोलन केले. यावेळी अचानक बॅरिकेड्स तोडून आत शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Tags: