Belagavi

पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विशेष कार्यशाळा; पोक्सो आणि एनडीपीएस कायद्याचे धडे

Share

बेळगाव शहर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज कायदा अद्यावत ठेवण्यासाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

दुसऱ्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या व शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या उपस्थितीत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन करण्यात आले.

पोक्सो आणि एनडीपीएस कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत व तपासाच्या टप्प्यांमध्ये घ्यावयाच्या काळजीबद्दल न्यायमूर्तींनी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. गुन्ह्यांचा तपास करताना कायदेशीर बाबी कशा तपासाव्यात याविषयी सखोल माहिती देण्यात आली.

या कार्यशाळेत शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Tags: