बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील कोलादूर गावात रोटरी क्लब ऑफ बेळगाव मिडटाऊनच्या वतीने सौर ऊर्जेवर चालणारी पाणीपुरवठा योजना आणि मंदिरांसाठी सौर दिवे बसवण्याच्या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे.


रोटरी जिल्हा अनुदान योजनेअंतर्गत एकूण १,००,००० रुपये खर्चाच्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या वॉटर लिफ्ट सिस्टमचे आणि सौर दिव्यांचे १६ ऑगस्ट रोजी यशस्वीरीत्या लोकार्पण करण्यात आले. पारंपारिक विजेवरील अवलंबित्व कमी करून ग्रामस्थांची गरज पूर्ण करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. रोटरीचे नियोजित गव्हर्नर (DGE) अशोक नाईक यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन करण्यात आले.


या कार्यक्रमाला रोटरी संस्थेचे अध्यक्ष उदयसिंग रजपूत, सचिव नंदन रागी, सहाय्यक गव्हर्नर राजेश कुमार तळेगाव, आनंद गुमास्ते आणि गावातील प्रमुख नागरिक उपस्थित होते.
या समाजोपयोगी उपक्रमासाठी अनुदान दिल्याबद्दल रोटरीचे जिल्हा गव्हर्नर अरुण भंडारे यांचे संस्थेने आभार मानले या योजनेमुळे सुमारे १०,००० ग्रामस्थ तसेच गुराढोरांसाठी पिण्याव्यतिरिक्त लागणाऱ्या पाण्यासाठी अखंड सुविधा उपलब्ध होणार आहे.


Recent Comments