Belagavi

स्वातंत्र्यदिनानिमित्त बेळगावमध्ये भव्य स्केटिंग रॅली

Share

स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने बेळगाव शहरात देशभक्तीचे वातावरण पाहायला मिळाले. बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त कौन्सिल स्केटिंग रिंक येथे विशेष स्केटिंग रॅलीचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.

या स्केटिंग रॅलीचे उद्घाटन प्रसिद्ध समाजसेवक अर्जुन केसरेकर यांच्या हस्ते झाले. ३ ते २५ वयोगटातील एकूण ४० खेळाडूंनी हातात तिरंगा घेऊन ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ आणि ‘हर घर तिरंगा’च्या घोषणा देत सलग ८० मिनिटे स्केटिंग केले. या कार्यक्रमाला प्रशिक्षक सूर्यकांत हिंदळेकर, योगेश कुलकर्णी, तुकाराम पाटील, मडीवाळे, शिवराज, सोहम हिंदळेकर यांच्यासह खेळाडू आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: