Belagavi

गर्लगुंजीत सैनिकी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या रविराज पाटील यांचा भव्य सत्कार

Share

खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी येथील युवक रविराज श्रीदत्त पाटील याने भोपाळ येथील ३ ईएमई भारतीय सैन्यदलात आपले प्रशिक्षण पूर्ण केले असून प्रशिक्षण पूर्ण करून तो गावी परतताच ग्रामस्थांच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला.

गर्लगुंजी येथील देसाई गल्लीत त्याच्या स्वागतासाठी विशेष तयारी करण्यात आली होती. सैनिक रविराज याचे आगमन होताच त्याचे औक्षण करून जल्लोषात स्वागत करण्यात आले. तसेच ग्रामस्थांच्या वतीने त्याला सन्मानित करण्यात आले.

याचबरोबर सैनिक रविराज पाटील याच्या सत्कार सोहळ्याचे औचित्य साधून मच्छे मराठी शाळेच्या शिक्षिका सौ. नीला सुरेश पाटील (बाळेकुंद्री) यांचाही सेवापूर्तीनिमित्त सत्कार करण्यात आला.

या सत्कार सोहळ्याला देसाई गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ओंकार महिला बचत गटाच्या महिला तसेच गावकरी व पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवृत्त मुख्याध्यापक एन. व्ही. देसाई यांनी केले, तर उपस्थितांचे स्वागत शिक्षिका सौ. नीता पाटील यांनी केले.

Tags: