Belagavi

बेळगावात कॉलेजसमोर गांजा मिश्रित चॉकलेटची विक्री; आरोपीला अटक

Share

बेळगाव येथील केएलई इंजिनिअरिंग कॉलेजसमोर नागरिकांना गांजा मिश्रित चॉकलेट विक्री करणाऱ्या एका आरोपीला उद्यमबाग पोलिसांनी अटक केली आहे. संशयिताकडून तब्बल ९४,६०० रुपये मूल्याचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

उद्यमबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत खडेबाजार उपविभागाचे एसीपी शेखरप्पा एच. यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निरीक्षक महांतेश होसपेटे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत मूळचा उत्तर प्रदेश येथील व सध्या हनुमान नगर येथे राहणारा भोलू जित्ताल प्रजापती याला ताब्यात घेण्यात आले. कॉलेजजवळ गांजा मिश्रित चॉकलेट विकताना पोलिसांनी धाड टाकून ही कारवाई केली. आरोपीकडून ५४,००० रुपये मूल्याचे ६ किलो ८५८ ग्रॅम वजनाचे २७ गांजा चॉकलेट पॅकेट्स, १०,००० रुपयांचा सॅमसंग मोबाईल, ६०० रुपयांची रोख रक्कम आणि ३०,००० रुपयांची स्कूटी असा एकूण ९४,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी उद्यमबाग पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

Tags: