वीरेश्वर नाट्य संघ, बागलकोट यांच्या वतीने ९ ऑगस्ट रोजी बेळगाव येथील कुमार गंधर्व रंगमंदिरात डॉ. मल्लिकार्जुन सिंदगी लिखित ‘संत शिशुनाळ शरीफ शिवयोगी’ या भक्तीप्रधान नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. कलाकार हनुमंतप्पा बागलकोट यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

संत शिशुनाळ शरीफ यांचे जीवन आणि संदेश या नाटकाच्या माध्यमातून मांडण्यात आले असून, हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारे हे नाटक आजच्या समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वांनी या नाटकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, सध्या मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे नाटकांवरील आवड कमी होत असून, अशा मूल्याधारित नाटकांना प्रेक्षकांनी उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मत हेमा पाटील यांनी व्यक्त केले. प्रवेशासाठी २०० रुपये शुल्क ठेवण्यात आले असून नागरिकांनी कुटुंबियांसह उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले. या पत्रकार परिषदेला महांतेश रणगट्टीमठ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments