Belagavi

श्रीरंग पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

Share

खानापूर येथील लैला शुगर्स कंपनीमधील कर्मचारी श्रीरंग पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला.

खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी येथील रहिवासी आणि लैला शुगर्सच्या विक्री विभागात २७ वर्षांपासून कार्यरत असलेल्या श्रीरंग पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी श्रीरंग पाटील आणि त्यांच्या पत्नी सुनीता पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

आपल्या सेवा काळातील स्नेहाच्या आठवणींना श्रीरंग पाटील यांनी उजाळा दिला, तर उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या प्रामाणिक सेवेचा गौरव करत भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

गर्लगुंजी ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष गोपाळ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास स्थानिक आमदार, लैला शुगर्सचे व्यवस्थापकीय संचालक यांच्यासह चांगापा निलजकर, यल्लापा तिरवीर, सुबराव पाटील, परशराम कांबळे, पीकेपीएसचे माजी अध्यक्ष सुभाष वसंतराव पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य पांडुरंग सावंत, लैला शुगर्सचे कृषी अधिकारी बाळासाहेब शेलार, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष हणमंत मेलगे, परशराम चौगुले आणि ॲडव्होकेट चेतन मणेरीकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार निट्टूरकर यांनी केले, तर राजू सिद्धाणी यांनी आभार मानले.

Tags: