बेळगावातील प्रभाग क्रमांक ३३ मधील मार्कंडेय नगर येथे नागरिकांना २४ तास पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन आणि बिलिंग प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.


सभेत एल अँड टीच्या अधिकारी चारुशीला यांनी पिण्याच्या पाण्याचे नवीन कनेक्शन घेणे आणि मासिक बिलिंग व्यवस्थेबाबत नागरिकांना सविस्तर माहिती दिली. या वेळी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील यांनी पाण्याचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच रेश्मा पाटील यांच्या प्रभागात ९० टक्के विकासकामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे लवकरच मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन दिले.

माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेविका रेश्मा पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेत एल अँड टी कंपनीचे अधिकारी, संतोष बोरकर, जाधव साहेब, ज्योती मुतगेकर, सुजाता पाटील, मेघा साळुंखे, भीमप्पा पाटील यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments