Khanapur

हलशी-बेकवाड रस्त्याची दुरवस्था; खड्ड्यांमुळे नागरिक आणि भाविक हैराण

Share

खानापूर तालुक्यातील ऐतिहासिक हलशी आणि बेकवाडला जोडणारा मुख्य रस्ता पूर्णपणे खड्ड्यात गेला असून, सामान्य नागरिक आणि श्रावण महिन्यात धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

ऐतिहासिक महत्त्व असलेल्या हलशी गावात दररोज शेकडो नागरिक ये-जा करतात. सध्या श्रावण महिना सुरू असल्याने पूजेसाठी व दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक याच रस्त्याने प्रवास करत आहेत. मात्र, रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.

निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी या समस्येकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप स्थानिक मतदारांनी केला आहे. रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

Tags: