संविधानाच्या चौकटीबाहेर जाऊन आमदारांनी शपथ घेतल्यास त्यांच्याविरोधात कायदेशीर लढा उभारू, असा इशारा माहिती अधिकार कार्यकर्ते भीमप्पा गडाद यांनी दिला आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या आमदारांना त्याची योग्य पद्धत माहीत नसणे हे अत्यंत दुर्दैवी आहे.

संविधानाच्या तिसऱ्या अनुसूचीनुसार मंत्र्यांनी केवळ देवाच्या नावाने किंवा सत्यनिष्ठेनेच शपथ घेणे बंधनकारक आहे.
नियमांचे उल्लंघन करून शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना कोणत्याही भत्त्याचा किंवा सरकारी सुविधांचा अधिकार उरणार नाही आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांनाही मान्यता असणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री व मुख्य सचिवांनी अशा नियमबाह्य शपथेला रोखावे, अन्यथा संविधानाचा अवमान करणाऱ्यांना न्यायालयात खेचू, असा पुनरुच्चार त्यांनी केला.


Recent Comments