मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकन कार्याची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी मुक्तकंठाने कौतुक केले.

बुधवारी सायंकाळी महापालिकेच्या निवडणूक शाखेला अचानक भेट देऊन त्यांनी महापालिका हद्दीतील उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये सुरू असलेल्या एसआयआर कामाचा तसेच संगणकीकरणाच्या प्रक्रियेचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांकडून कामाची माहिती घेत त्यांनी एसआयआर यशस्वी करण्यासाठी अविरत परिश्रम घेणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. वाणीदोष असलेले विशेष कर्मचारी विशाल माविनकट्टी यांच्या अचूक आणि उत्कृष्ट कार्याचेही त्यांनी विशेष कौतुक केले.

आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन आणि समन्वयामुळे कामात चांगली प्रगती साधता आली असून, इतर कर्मचाऱ्यांसाठीही हे प्रेरणादायी उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला भेट देऊन उद्यानाच्या उत्कृष्ट देखभालीबद्दल समाधान व्यक्त केले.
महापालिकेचे महसूल विभागाचे उपआयुक्त तथा दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी डॉ. सिद्धू हुल्ळोळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एसआयआर कामाच्या प्रगतीबाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी अधिकारी, पर्यवेक्षक तसेच एसआयआर आणि महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments