बेळगावमधील जुन्या महापालिका इमारतीजवळ आश्रय घेणाऱ्या अर्जुन तारीहाळ या निराधार रुग्णाला सिव्हिल हॉस्पिटलमधून उपचाराविनाच डिस्चार्ज देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलसमोर जोरदार निदर्शने केली.

रुग्णालयातील डॉक्टरांनी पुरेशी तपासणी न करताच रुग्णाला बाहेर काढल्याचा आरोप करण्यात आला. शंभर पाटील यांनी यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणाकडूनही प्रतिसाद मिळाला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. निराधार रुग्णांच्या उपचाराबाबत होणारी हेळसांड थांबवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक कुमार शेट्टी यांनी घटनास्थळी भेट देऊन रुग्णाला मज्जातंतूच्या उपचारासाठी पुन्हा दाखल करून घेण्याचे आश्वासन दिले. तसेच विनाकारण डिस्चार्ज देणाऱ्या दोषी कर्मचाऱ्यांची चौकशी करून कडक कारवाई केली जाईल, असे डॉ. अशोक कुमार शेट्टी यांनी म्हटले.


Recent Comments