बेळगाव शहरातील ऐतिहासिक किल्ला तलाव परिसरात नागरी संरक्षण दलाच्या कर्मचाऱ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन विशेष प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली. आपत्कालीन परिस्थितीतील धोके रोखण्यासाठी कर्मचाऱ्यांना बोट चालवण्यासह विविध महत्त्वाच्या गोष्टींचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले.


राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या कर्मचाऱ्यांनी या एकदिवसीय कार्यशाळेचे संचालन केले. पूर किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीदरम्यान बचाव कार्य कसे राबवावे, याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. प्रामुख्याने बोट चालवणे, बोटींची योग्य देखभाल करणे आणि बचाव उपकरणांचा प्रभावी वापर यावर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.


या शिबिरात एसडीआरएफचे पोलीस निरीक्षक शिवानंद गुणदाळ आणि त्यांच्या पथकाने प्रशिक्षण दिले. तसेच निवृत्त कमांडंट राघवेंद्र पेटकर यांनी आपत्तीच्या वेळी बजावायच्या कर्तव्यांविषयी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास गृहरक्षक दलाचे कमांडंट चन्नप्पा अथणी, सहाय्यक कमांडंट बाबासाहेब कांबळे, निवृत्त कमांडंट राघवेंद्र पेटकर, निवृत्त सहाय्यक कमांडंट सी. बी. भडकल आणि आनंद नावलगी यांच्यासह इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते.



Recent Comments