बेळगावच्या उद्यमबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दुचाकी चोरी प्रकरणाचा यशस्वी उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

गुरुप्रसाद नगर येथील रहिवासी नागराज रामचंद्र आचारी यांची दुचाकी १७ जुलै रोजी चोरीला गेली होती. या संदर्भात उद्यमबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर, पोलीस निरीक्षक महांतेश व्ही. होसपेटी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तपास तीव्र केला.

तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक यु. बी. कट्टीकर, प्रवीण बिरादार आणि त्यांच्या पथकाने संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून २५,००० रुपये किमतीची स्कुटर आणि ३५,००० रुपये किमतीची मोटारसायकल अशी एकूण ६५,००० रुपयांची वाहने जप्त करण्यात आली असून, नियमानुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवली जात आहे.


Recent Comments