Belagavi

बेळगावात एस. निजलिंगप्पा साखर संस्थेत चर्चासत्र

Share

बेळगाव येथील एस. निजलिंगप्पा साखर संस्थेत साखर कारखान्यांच्या मिलिंग कार्यक्षमतेविषयी एकदिवसीय चर्चासत्र पार पडले.

संस्थेच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन रोपट्याला पाणी घालून करण्यात आले. पुण्यातील वसंतदादा साखर संस्थेचे निवृत्त अभियांत्रिकी विभागप्रमुख सूर्यनारायण शास्त्री या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे संचालक राजगोपाल यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले.

तांत्रिक सल्लागार सी. बी. पाटील यांनी या चर्चासत्राच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. सूर्यनारायण शास्त्री यांनी मिलची निगा, रोलर्सची स्थिती, मिल सेटिंग आणि पाण्याचे प्रमाण याविषयी तांत्रिक माहिती दिली.

या कार्यक्रमात राज्यातील विविध साखर कारखान्यांमधील १२० हून अधिक तांत्रिक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. राहुल पाटील यांनी सूत्रांचे संचालन केले, तर शंकर धर्मट्टी यांनी आभार मानले.

Tags: