State

मंत्रिमंडळ विस्तारात पक्षाची गरज असेल त्यांनाच संधी मिळेल: सतीश जारकीहोळी

Share

मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रीपद वाटपाबाबत पक्षाचा निर्णय अंतिम असून, ज्यांची पक्षाला आवश्यकता आहे त्यांनाच संधी दिली जाईल, अशी भूमिका सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी मांडली.

२०२८ मध्ये सतीश जारकीहोळी मुख्यमंत्री होतील या खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या वक्तव्यावर बोलताना, २०२८ आल्यावर त्याबाबत विचार करू, असे सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. तसेच राज्यात अतिरिक्त उपमुख्यमंत्रीपदाची कोणतीही मागणी करण्यात आली नसून हायकमांडचा निर्णय अंतिम असेल असे त्यांनी सांगितले.

आमदार लक्ष्मण सवदी यांच्या मंत्रीपदाबाबत बोलताना, पक्षाची गरज लक्षात घेऊन हायकमांड योग्य तो निर्णय घेईल असे त्यांनी नमूद केले. याच वेळी दिल्लीतील नीट परीक्षा गोंधळावरून केंद्र सरकारवर टीका करत, सरकारने वेळीच विद्यार्थ्यांशी चर्चा करून या समस्येवर तोडगा काढायला हवा होता, असे सतीश जारकीहोळी यांनी म्हटले.

Tags: