विजापूर शहरातील ऐतिहासिक जोरापूर पेठ येथील श्री अंबाभवानी मंदिराचा १४ वा वर्धापन दिन धार्मिक उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.


या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ५:३० वाजल्यापासून श्री अंबाभवानी देवीची नित्यपूजा, पंचामृत अभिषेक, रुद्राभिषेक आणि विशेष अलंकार पूजा वैदिक मंत्रोच्चारात पार पडली. रेशमी वस्त्रे आणि विविध फुलांनी सजवलेले देवीचे रूप भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. यानंतर नवग्रह होम, दिक्पालक होम आणि श्रीसूक्त महालक्ष्मी होम पूर्णाहुतीने संपन्न झाला.


वर्धापन दिनानिमित्त भव्य पालखी सोहळा काढण्यात आला. ढोल-ताशांच्या गजर आणि “जय अंबे”च्याघोषात शहराच्या प्रमुख मार्गांवरून देवीची पालखी मिरवणूक काढण्यात आली. यानंतर सुवासिनींचा ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला, ज्यामध्ये शेकडो महिलांनी सहभाग घेतला. दुपारच्या वेळी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. वर्धापन दिनानिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई व पुष्पसजावट करण्यात आली होती.
– विजयकुमार सारवाड, इन न्यूज, विजापूर.


Recent Comments