Vijayapura

विजापूर: आलमेल नगर पंचायत अध्यक्षांच्या घरी जुगार अड्डा; १५ जणांवर गुन्हा

Share

विजापूर जिल्ह्यातील आलमेल शहरात एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. नगर पंचायत अध्यक्षांच्या घरातच पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाड टाकून अध्यक्षांसह १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजापूर जिल्ह्यातील आलमेल येथील नगर पंचायत अध्यक्ष महम्मद सादिक सुंबड यांच्या घरी बेकायदेशीर जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून ४२ हजार ७५० रुपयांची रोकड आणि तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी अध्यक्षांसह १५ जणांविरुद्ध आलमेल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपींमध्ये अध्यक्षांच्या दोन भावांचाही समावेश आहे.

लोकप्रतिनिधीच्याच घरात जुगार अड्डा सापडल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, माजी आमदार रमेश भुसनूर यांनी या प्रकाराचा निषेध केला असून, पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

नगर पंचायत अध्यक्षांच्या घरातच जुगार अड्डा उघडकीस आल्यामुळे आलमेल शहरात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

विजयकुमार सारवाड, इन न्यूज, विजापूर.

Tags: