Savadatti

सवदत्ती तालुक्यात चालत्या बसमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटांत हाणामारी

Share

बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती तालुक्यात चालत्या बसमध्ये एका विद्यार्थिनीची छेडछाड झाल्याच्या कारणावरून विद्यार्थ्यांच्या दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.

सवदत्ती तालुक्यातील जक्कबाळ गावाजवळ बसमधून प्रवास करणाऱ्या एका विद्यार्थिनीची छेडछाड झाल्याच्या आरोपावरून जक्कबाळ आणि बसरगी या दोन गावांतील विद्यार्थ्यांमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद वाढल्यानंतर दोन्ही गटांतील तरुणांनी रस्त्यावर उतरून दगड आणि काठ्यांनी एकमेकांना मारहाण केली.

विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने योग्य पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळूनही सवदत्ती पोलिस आणि वाहतूक मंडळाचे अधिकारी घटनास्थळी वेळेवर न पोहोचल्याने स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र असंतोष व्यक्त केला आहे.

Tags: