बेळगावमध्ये सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरातील संवेदनशील भागात रॅपिड ॲक्शन फोर्सचे पथसंचलन पार पडले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील न्यू गांधी नगर परिसरात रॅपिड ॲक्शन फोर्स आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी भव्य पथसंचलन केले.

गणेशमूर्तींचे विसर्जन आणि मिरवणुका शांततेत आणि सौहार्दाच्या वातावरणात पार पडाव्यात, यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करणे आणि कायदा हातात घेणाऱ्यांना कडक इशारा देणे, हा या पथसंचालनाचा मुख्य उद्देश होता.


Recent Comments