Khanapur

ई केवायसीसाठी रेशन दुकानदारांना एक रुपयाही देऊ नका :सूर्यकांत कुलकर्णी

Share

खानापूर तालुक्यातील रेशन कार्डधारकांसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्णपणे मोफत असून रेशन दुकानदारांना कोणत्याही कारणासाठी पैसे देऊ नयेत, असे आवाहन तालुका पंचायत गॅरंटी योजना अंमलबजावणी प्राधिकरणाचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी केले आहे.

खानापूर तालुक्यात सध्या सुरू असलेली रेशन कार्डची ई-केवायसी प्रक्रिया ही शासनाकडून पूर्णपणे मोफत आहे. त्यामुळे नागरिकांनी दुकानदारांना एक रुपयाही देऊ नये, असे सूर्यकांत कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे. ई-केवायसी पूर्ण न झाल्यास दुकानदारांना रेशन कोटा मिळत नसल्यामुळे ही प्रक्रिया मोफत पूर्ण करणे ही त्यांचीच जबाबदारी आहे. पैसे घेतल्याचे आढळल्यास संबंधित रेशन दुकानाचा परवाना रद्द करण्याची शिफारस केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. नागरिकांनी कोणत्याही फसवणुकीला बळी न पडता, दुकानदारांनी पैशांची मागणी केल्यास तत्काळ गॅरंटी योजनेच्या अध्यक्षांकडे किंवा सदस्यांकडे तक्रार करावी, असे आवाहन सूर्यकांत कुलकर्णी यांनी केले आहे.

Tags: