Belagavi

बेळगावात कामादरम्यान निष्काळजीपणा; भररस्त्यात खड्डा खोदून ठेवल्याने नागरिक हैराण!

Share

बेळगाव शहरातील यु.के. हॉटेलजवळ सुरू असलेल्या कामात कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. भररस्त्यात अर्धवट खड्डा खोदून तसाच सोडल्याने वाहनधारकांचे अपघात होत असून स्थानिक नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

यु.के. हॉटेलशेजारील मुख्य रस्त्यावर एका खाजगी कंपनीने रात्रीच्या वेळी काम करताना रस्त्याच्या मध्योमध्य मोठा खड्डा खोदला आणि तो व्यवस्थित न बुजवताच निघून गेले.

कोणताही इशारा किंवा सूचना फलक न लावल्यामुळे रात्रीच्या वेळी येणाऱ्या वाहनधारकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही. यामुळे अनेक कार आणि दुचाकी या चिखलमय खड्ड्यात अडकून पडत आहेत.

तासनतास गाड्या अडकल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे महानगरपालिका व संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ जागे होऊन निष्काळजी खाजगी कंपनीवर कठोर कारवाई करावी आणि रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी आक्रमक मागणी नागरिकांनी केली आहे.

Tags: