Vijayapura

‘एसआयआर’ प्रक्रियेत गैरव्यवहार; विजापूर महापालिका सदस्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन!

Share

विजापूर शहरात सुरू असलेल्या विशेष तीव्र पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत विजापूर महापालिकेच्या महापौरांसह सदस्यांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

शहरातील अनेक बीएलओ (BLO) केवळ टक्केवारी वाढवण्यासाठी घरोघरी न जाताच “घर सापडत नाही” किंवा “इतरत्र मतदार आहेत” अशी कारणे देऊन घाईगडबडीत पंचनामा करत अहवाल सादर करत असल्याचा आरोप सदस्यांनी केला.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून ‘एसआयआर’ प्रक्रिया पारदर्शक आणि नियमानुसार पार पाडावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

या वेळी विजापूर महापालिकेचे महापौर एम. एस. करडी, नगरसेवक शिवरुद्र बागलकोट, राहुल जाधव, मल्लिकार्जुन गडगी, राजू कुरियावर आणि शंकर हुगार उपस्थित होते.

Tags: