मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षणचे काम १००% यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या शहापूर येथील बसवान गल्लीतील बीएलओ यांच्या घरी स्वतः जाऊन बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा गौरव केला.

जो कर्मचारी मतदार यादी पुनरीक्षणाचे (SIR) काम १००% पूर्ण करेल, त्याच्या घरी स्वतः जाऊन सत्कार करेन असे आश्वासन बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले होते. त्यानुसार आज शहापूरच्या बसवान गल्लीतील बीएलओ यांच्या निवासस्थानी थेट पोहोचून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करत त्यांचा सन्मान केला.

याबाबत माहिती देताना बेळगाव महानगरपालिकेचे उपआयुक्त सिद्धू हुल्लोळी यांनी सांगितले की, बेळगाव दक्षिण मतदारसंघात एसआयआरचे काम अत्यंत शिस्तबद्ध व पद्धतशीरपणे सुरू असून बीएलओ आणि कर्मचाऱ्यांच्या कामगिरीबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. आतापर्यंत सुमारे १.६० लाख मतदारांची माहिती डिजिटल करण्यात आली असून (६३ टक्के प्रगती), उर्वरित ७० हजार मतदारांची माहिती लवकरच पूर्ण केली जाईल.
यावेळी नागरिकांनी आपल्याकडे दिलेले फॉर्म योग्य प्रकारे भरून द्यावेत किंवा माहिती न समजल्यास बीएलओंकडे परत करावेत, अन्यथा मतदार यादीतून नाव वगळले जाण्याची शक्यता आहे, असे आवाहनही त्यांनी केले.
दिलेल्या शब्दाप्रमाणे वागत बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. या प्रसंगी महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि नगरसेवक रवी साळुंके उपस्थित होते.


Recent Comments