Uncategorized

शिक्षणमहर्षी नाथाजीराव हलगेकर यांना खानापुरात आदरांजली

Share

दिवंगत नाथाजीराव हलगेकर यांच्या २१ व्या स्मृतिदिनानिमित्त खानापूर येथील मराठा मंडळ पदवी कॉलेजमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी ज्येष्ठ पत्रकार वासुदेव चौगुले यांनी मुख्य वक्ते म्हणून उपस्थित राहून नाथाजीराव हलगेकर यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचा गौरव करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.


१९७९ मध्ये नाथाजीराव हलगेकर यांनी खानापूर येथे प्रथमच पदवी कॉलेज सुरू करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, विशेषतः मुलींना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार वासुदेव चौगुले यांनी केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे मराठा मंडळ संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात मोठी प्रगती साधली आहे.

कॉलेजचे प्राचार्य प्रा. जे. बी. अंची यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभात नाथाजीराव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी डॉ. आय. एम. गुरव, डॉ. राजश्री तिर्वीर, डॉ. विजयलक्ष्मी तीर्लापूर, प्रा. कपिल गुरव यांच्यासह कॉलेजचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: