बेळगाव-पणजी महामार्गावरील लोंढा फाटा येथे लोंढा ग्रामपंचायत आणि उद्योगपती प्रसन्न घोटगे यांच्या संयुक्त विद्यमाने नवनिर्मित प्रवेशद्वाराचा उद्घाटन सोहळा पार पडला.

प्रसन्न घोटगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमात अशोक नेसरीकर यांच्या हस्ते फलक पूजन, तर प्रसन्न घोटगे यांच्या हस्ते फीत कापून प्रवेशद्वाराचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी लोंढा ग्रामपंचायतीचे पीडीओ खोत, अध्यक्ष निळकंठ ऊसपकर, संतोष भूतकी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

तसेच, लोंढा हायस्कूलतर्फे प्रसन्न घोटगे यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी होतकरू विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी शाळेचे सेक्रेटरी संतोष भूतकी, मुख्याध्यापक एन. डी. पाटील, विलास गावडे, महादेव सावंत, शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.


Recent Comments