Uncategorized

विजापूर: भीषण अपघातात बाप-लेकीचा जागीच मृत्यू

Share

विजापूर जिल्ह्यातील निडगुंदी मु्द्देबिहाळ क्रॉसजवळ राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टर आणि लारीचा अपघात होऊन बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोन कामगार जखमी झाले आहेत.

उसाच्या टोळीचे कामगार ट्रॅक्टरने चालले असताना स्पीड ब्रेकरमुळे ट्रॅक्टरचा वेग कमी झाला. त्याच वेळी पाठीमागून आलेल्या वेगात असलेल्या लारीने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की ट्रॅक्टरमधील बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोन कामगारांना किरकोळ दुखापत झाली.

घटनेची माहिती मिळताच निडगुंदी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आणि जखमींना उपचारासाठी निडगुंदी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी निडगुंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Tags: