बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रेल्वे स्टेशन रस्त्यावरील पथविक्रेत्यांच्या समस्येबाबत आमदार आसिफ सेठ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम हरी मंचालवार यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली.

नागरिकांना आणि पादचाऱ्यांना ये-जा करताना कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून विक्रेत्यांनी पदपथ सोडून मागे बसून व्यवसाय करावा, असे निर्देश सीइओंनी दिले.

या निर्णयामुळे रेल्वे स्टेशन रस्त्यावरील वाहतूक कोंडी टळण्यास मदत होणार असून, पादचाऱ्यांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे.


Recent Comments