Belagavi

बेळगाव कॅम्प परिसरातील समुदाय भवनाचे काम अखेर सुरू

Share

बेळगाव कॅम्प परिसरातील अर्धवट राहिलेल्या समुदाय भवनाच्या कामासाठी आमदार आसिफ सेठ यांनी मुख्यमंत्री निधीतून १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून या कामाला सुरुवात झाली आहे

आमदार आसिफ सेठ यांनी २०१६ पासून रखडलेल्या या कामाची पाहणी करून उर्वरित कामे लवकरच पूर्ण केली जातील असे सांगितले याशिवाय कॅम्प परिसरातील रस्ते गटारी आणि विजेच्या कामांसाठी अतिरिक्त ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली

कॅम्प परिसराच्या विकासासाठी सतत निधी आणल्याबद्दल छावणी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंचलवार सुधाम हरिविजय यांनी आमदारांचे आभार मानले तसेच आमदारांच्या या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांनी आणि कसाब जमातच्या नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे

Tags: