Belagavi

वडगावच्या श्री मंगाई मंदिरात ‘दुष्काळाचे वास्तव’ आणि ‘पंढरपूर वारीची’ आकर्षक आरास

Share

वडगाव येथील ग्रामदैवत श्री मंगाई मंदिरात यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी वार पाडण्यात आला. यावेळी देवीच्या गाभाऱ्यात राज्यातील दुष्काळाची वास्तवता आणि पंढरपूर वारीची आकर्षक आरास करण्यात आली होती.

यंदा पाऊस न पडल्याने बळीराजा संकटात सापडला असून, शेतकर्‍यांची हीच व्यथा आणि शेतीची सद्यस्थिती या कलात्मक देखाव्यातून मांडण्यात आली आहे.

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल-रुक्मिणी, वारकरी आणि पंढरपूर वारीची भक्तीमय आरास देवीच्या सन्निध्यात उभारण्यात आली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री मंगाई मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम अत्यंत श्रद्धेने पार पडत असल्याची माहिती विनायक चव्हाण पाटील यांनी दिली.

यानिमित्त देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती, तसेच राज्यात चांगला पाऊस पडून शेतकर्‍यांचे संकट दूर व्हावे यासाठी साकडे घालण्यात आले.

Tags: