Vijayapura

विजापूरमध्ये जागेच्या वादातून तुफान हाणामारी

Share

विजापूर तालुक्यातील अंकलगी गावात जागेच्या वादातून दोन कुटुंबांत वाद होऊन एकाला हातपाय बांधून मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून दोन्ही बाजूंनी तक्रारी दाखल झाल्या आहेत.

अंकलगी गावात जागेवरील दुकान हटवण्याच्या कारणावरून वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. अनिल, सुनील आणि बोरव्वा यांनी घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप पीडित व्यक्तीच्या पत्नीने केला आहे.

दुसऱ्या बाजूने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. संबंधित व्यक्ती दररोज मद्यपान करून त्रास देत असल्याने विचारणा करायला गेलो असता त्यांनीच आधी हल्ला केल्याचा दावा प्रतिपक्षाने केला आहे. यात सुनील हेदेखील जखमी झाले आहेत.
वर्षानुवर्षांच्या जुन्या वैमनस्यातून हा प्रकार घडला असून पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारींची नोंद घेत चौकशी सुरू केली आहे. तपासाअंती घटनेचे सत्य समोर येणार आहे.

विजयकुमार सारवाड
इन न्यूज, विजापूर

Tags: